ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात, लग्नाआधी वधू वराला हळद लावण्याची प्रथा खूप महत्वाची मानली जाते.
अनेक विधींपैकी एक म्हणजे, लग्नाच्या एक ते दोन दिवस आधी नवरा नवरीला हळद लावली जाते.
तुम्ही कधी विचार केला आहे का, लग्नाआधी नवरा नवरीला हळद का लावली जाते. जाणून घ्या.
हळदीला शुभ मानली जाते. म्हणून शुभ कार्यासाठी हळदीचा वापर केला जातो.
मान्यतेनुसार, हळद केवळ शरीर शुद्ध करत नाही तर नकारात्मक उर्जेपासून देखील संरक्षण करते.
हळदीमध्ये करक्युमिनियम सोबत काही घटक आढळतात. जे शरीराला शांत आणि आराम देण्यास मदत करतात.
हळद त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्वचेला संक्रमणापासून वाचवण्यासह चमकदार बनवते.