ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात डिहायड्रेशनची समस्या होणे सामान्य आहे. डिहायड्रेशनपासून बचाव करण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. दिवसभरातून कमीत कमी ८ ते १० ग्लास पाणी प्या.
कलिंगड, काकडी, संत्री आणि नारळ पाणी यासारख्या फळांमध्ये शरीराला आवश्यक इलक्ट्रोलाइट्स असतात. या फळांचा डाएटमध्ये नक्की समावेश करा.
ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीराला हायड्रेट ठेवण्याचं काम करतात.
प्रोबायोटिक्सने भरपूर दही आणि ताक शरीराची पचनसंस्था सुरळीत ठेवण्याचं काम करतात. आणि शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवतात.
उन्हाळ्यात, विशेषत: दुपारच्या वेळेस बाहेर जाणं टाळा. तसेच उन्हापासून संरक्षण करण्यासाठी स्कार्फचा वापर करा.
उन्हाळ्यात सैल कपडे घाला. यामुळे शरीराला थंडावा मिळतो.