ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारतात राहून युरोपचा फिल घ्यायचा आहे? तर दक्षिण भारतातील या नैसर्गिक सौदर्यांनी नटलेल्या हिल स्टेशनला नक्की भेट द्या.
कोडाईकॅनला भारतातील स्कॉटलँड देखील म्हणतात. येथील युरोपीयन स्टाइल घरे, पाइनची जंगले आणि धुक्याची पसरलेली चादर तुमचा क्षण अविस्मरणीय करतील.
जर तुम्हाला चहाची मळे आणि आकर्षक कॉटेज आवडत असतील, तर कुन्नूरला नक्की भेट द्या. येथील सिम्स पार्क बोटॅनिकल गार्डन, हेरिटेज बंगले आणि नीलगिरी माउंटन रेल्वे, तुम्हाला युरोपमध्ये आल्यासारखे भास करुन देतील.
भारतातील स्वित्झर्लंड म्हणजे मुन्नार. पर्वतरांगामध्ये पसरलेली धुक्याची चादर, चहाच्या मळ्यांनी वेढलेल्या डोंगराची नयनरम्ये दृश्ये, आणि शांत वातावरण तुमच्या ट्रिपला अविसम्रणीय करतील. या थंड हवेच्या ठिकाणी नक्की भेट द्या.
येथील टॉय ट्रेन, चहाची मळे, आणि युरोपीयन आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध असलेले हे थंड हवेचे ठिकाण भारतीय पर्यटकांना आकर्षित करते.
वॅगमॉनमधील दऱ्या, आणि पाइनची जंगले युरोपीयन देश आयर्लंडची आठवण करुन देतात. येथे तुम्ही पॅराग्लायडिंग, ट्रेकिंग आणि रॉक क्लाइबिंगचा आनंद घेऊ शकता.
येरकॉडला गरीबांची ऊटी देखील म्हणतात. येथे तुम्हाला चहाच्या मळ्यांपासून फ्रेंच स्टाइल व्हिला देखील पाहायला मिळतील. किल्लिपुर फॉल्स आणि लेडीज सीट व्यूपॉईंट या ठिकाणी नक्की भेट द्या.