ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आवळ्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, आयरन, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे पोषक घटक असतात.
आवळ्याच्या ज्यूसमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. रिकाम्या पोटी आवळ्याच्या ज्यूस प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतात. रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
आवळ्याचा ज्यूस शरीरातील पाचक एंजाइम सक्रिय करतो. तसेच गॅस, बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटी या समस्यांपासून आराम मिळतो.
आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार आणि तरुण होते.
आवळ्याचा ज्यूस केसांच्या मुळांना पोषण देतो. हे केस गळणे कमी करते आणि त्यांना जाड करते.
आवळ्याच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन ए आणि के असतात. जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.