ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सासू सुनेच नातं थोडं आबंट थोड गोड असतं. परंतु जर तुम्हालाही तुमच्या सुनेसाठी चांगली सासू बनायचं असेल तर या गोष्टी नक्की करा.
तुमच्या सुनेबद्दल कधीही इतरांना वाईट बोलू नका. सुनेच्या प्रत्येक कामात चुका काढू नका.
तुमच्या मुलाला तुमच्या सुनेविरुद्ध भडकवू नका.
तुमच्या कुटुंबासमोर आणि नातेवाईकांसमोर, तुमच्या सुनेच्या आईवडिलांबद्दल कधीही वाईट बोलू नका.
हुंडा आणि पैशांबद्दल तुमच्या सुनेला कधीही टोमणे मारू नका.
मुलगा आणि सुनेतील भांडणात नेहमीच सुनेला दोष देऊ नका.
तुमच्या सुनेच्या निर्णयांमध्ये दोष काढू नका. तिच्या निर्णयाचा सम्मान करा.