Bhagyashree Kamble
कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी म्हणूनही ओळखलं जातं. कोल्हापुरमध्ये फुटबॉल ९२ वर्षांपासून रूजला आहे.
कोल्हापूरमध्ये ब्रिटिश काळापासून फुटबॉल खेळला जात आहे. येथे या खेळाची समृद्ध परंपरा आहे.
कोल्हापूरमध्ये अनेक स्थानिक फुटबॉल स्पर्धा होतात. ज्या युवा खेळाडूंना प्लॅटफॉर्म देतात.
फुटबॉलवरील प्रेमामुळे हा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून गर्दी करतात. स्टेडीयम प्रेक्षकांनी तुंडब भरून जाते.
कोल्हापूरमध्ये अनेक फुटबॉल क्लब कार्यरत आहेत. जे खेळाडूंना व्यावसायिक पातळीवर खेळण्याची संधी देतात.
कोल्हापूरमध्ये हवामान या खेळासाठी अनुकूल आहे. तसेच चांगली मैदाने उपलब्ध आहेत.
कोल्हापूरमधून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे.
कोल्हापुरच्या छत्रपती शाहू महाराज यांनी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले होते. फुटबॉलला विशेष प्राधान्य देत त्यांनी या खेळाचा प्रसार केला होता.
फक्त 'विकी कौशल' नाही तर या अभिनेत्यांनीही साकारलीये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका