Saam Tv
हत्ती हा प्राणी माणसाच्या आवडीचा आणि प्रामाणिक प्राणी म्हणून आपण ओळखतो.
हत्ती दिसायला सुबक आणि आकार्षित असतात. मात्र त्यांची शारीरिक क्षमता सगळ्यात जास्त असते.
पण तुम्ही लहान पणापासून मुंगी आणि हत्तीची गोष्ट ऐकलीचं असेल.
त्या गोष्टीत इतका विशाल हत्ती एका नखा ऐवढ्या मुंगीला घाबरतो हे म्हंटले आहे.
ही बाब खरी आहे का? हा प्रश्न अनेकांना पडतो. याचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.
एका रिसर्चमध्ये असे समोर आले की, हत्ती लहान भागात शिरू शकत नाही. त्याच भागात मुंग्यांचे वर्चस्व असते.
खरं तर हत्तीला मुंग्यांच्या वास येत असतो. हत्तीची त्वचा एक इंच जाड असते. पण खूप संवेदनशील आणि नाजूक असते.
मुंग्यांच्या वासावरून हत्तींना कळतं की मुंग्या त्यांच्यासाठी धोकादायक असू शकतात.
हत्तींना भीती असते की मुंग्या त्यांच्या सोंडेत घुसून त्यांना चावू शकतात.