Birthday Rituals: वाढदिवसाला केक का कापला जातो? जाणून घ्या रंजक माहिती

Dhanshri Shintre

केक कटिंग

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये केक कटिंग अपरिहार्य असते, केकशिवाय वाढदिवस साजरा अधुरा वाटतो.

केक कापण्याची परंपरा

कधी विचार केला आहे का, वाढदिवसाला केक कापण्याची परंपरा का पाळली जाते? कारण काय आहे?

परंपरा कुठून आली?

वाढदिवसाला केक कापण्याची परंपरा प्राचीन ग्रीक (युनानी) संस्कृतीतून सुरू झाल्याचे मानले जाते.

युनानी देवी

युनानी देवी आर्टेमिसच्या वाढदिवसाला केकवर मेणबत्त्या लावून तो कापण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे.

केक कापण्याची प्रथा

युनानी परंपरेनुसार, चंद्राची देवता आर्टेमिस यांच्या वाढदिवशी लोक गोल आकाराचा केक कापण्याची प्रथा आहे.

चंद्राचे प्रतीक

गोल आकाराचा केक चंद्राचे प्रतीक मानला जातो आणि त्यावरच्या मेणबत्त्या तेज व प्रकाशाचे प्रतीक असतात.

आर्टेमिसचा वाढदिवस

यामुळेच आर्टेमिसच्या वाढदिवसानिमित्त चंद्राचे प्रतीक असलेला केक कापण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे.

जुनी प्रथा

ही अनेक वर्षे जुनी प्रथा आता संपूर्ण जगभर पसरली असून विविध संस्कृतींमध्ये साजरी केली जाते.

केक वापरण्याची सुरुवात

जर्मनीमध्ये केक वापरण्याची सुरुवात झाली असून, मेणबत्त्या लावलेला केक कापणे शुभ संकेत मानले जाते.

मेणबत्त्याला काय म्हणतात?

'Light of Life' म्हणतात त्याला, वाढदिवस समारंभाला 'Kinderfest' म्हणतात, अशी माहिती एका वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे.

NEXT: केक आवडतो पण तो ताजा आहे की खराब? जाणून घ्या ओळखण्याचे सोपे पर्याय

येथे क्लिक करा