Spoiled Cake Signs: केक आवडतो पण तो ताजा आहे की खराब? जाणून घ्या ओळखण्याचे सोपे पर्याय

Dhanshri Shintre

खराब केक

कधी कधी चव आणि दिसण्यावर विश्वास ठेवून आम्ही खराब किंवा कालबाह्य केकही खातो, जे आरोग्यास धोका ठरू शकते.

विषबाधा

ही चूक अन्न विषबाधा, पोटदुखी आणि गॅससारख्या गंभीर समस्यांना कारणीभूत ठरू शकते, त्यामुळे काळजी घ्या.

सोपे मार्ग

या वेब स्टोरीमध्ये खराब केक ओळखण्याचे सोपे मार्ग आणि त्यातून होणारे आरोग्य धोके टाळण्याचे उपाय दिले आहेत.

आरोग्य समस्या

खराब केक कसा ओळखायचा आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या कशा टाळायच्या याची माहिती आहे.

केकवर बुरशी

केकवर पांढरी किंवा हिरवी बुरशी आढळल्यास तो खराब झाला आहे असे समजा आणि ताबडतोब तो फेकून द्या.

केकची चव

केकची चव वेगळी किंवा विचित्र वाटल्यास तो खाण्यास योग्य नाही, त्यामुळे त्याचा वापर टाळा.

तारीख तपासा

बाजारातील केक, मफिन आणि पेस्ट्री खरेदी करताना उत्पादन तारीख आणि कालबाह्यता काळजीपूर्वक तपासा.

जुना केक

३-४ दिवसांहून जुना केक खाणं आरोग्यास धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे ताजंचं केकच खावं.

केकवर कोरडेपणा

ताजा केक मऊ असतो. कोरडेपणा आणि भेग दिसल्यास तो शिळा असून खाण्यासाठी योग्य नाही.

NEXT: तणाव, थकवा आणि अपचनावर रामबाण उपाय! रोज करा चहाच्या कोवळ्या पानांचे सेवन

येथे क्लिक करा