Dhanshri Shintre
अॅक्सिओम-४ मोहिमेतील 'ग्रेस ड्रॅगन' यानाचे यशस्वी 'स्प्लॅशडाऊन' झाले.
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह चौघेजण सुखरूप पृथ्वीवर परतले.
अंतराळातून यान आल्यावर पॅराशूटच्या साहाय्याने ते पाण्यात उतरवले जाते.
या प्रक्रियेला 'स्प्लॅशडाऊन' म्हणतात. जेव्हा यान पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करते, तेव्हा त्याचा वेग ताशी हजारो किलोमीटर असतो.
यामुळे अंतराळयानाचे नुकसान होऊ शकते. अशावेळी अंतराळयानाला विशेष उष्णता कवचाने संरक्षण दिले जाते.
अंतराळयान वातावरणात प्रवेश केल्यावर त्याचा वेग कमी करण्यासाठी पॅराशूट वापरला जातो.
अंतराळयान पाण्यात उतरवले जाते; कारण पाणी नैसर्गिक उशीचे काम करते आणि जेव्हा यान पाण्यात उतरते, तेव्हा त्याला जमिनीपेक्षा कमी धक्का बसतो.
पाण्यावर अंतराळयान उतरवण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, त्याचा पृष्ठभाग सामान्य आणि सुरक्षित असतो. डोंगर, उतार किंवा जमिनीवरील रुक्षतेमुळे अपघात होऊ शकतात.