Dhanshri Shintre
प्रत्येक देशाची जीवनशैली, पेहराव आणि कायदे वेगळे असतात. असाच एक देश आहे जिथे दोन राष्ट्रपती असतात. जाणून घ्या यामागचं कारण.
जगातील अनेक देशांमध्ये एक राष्ट्रपती असतो, पण या अनोख्या देशात दोन राष्ट्रपती कार्यरत आहेत.
युरोपातील सॅन मारिनो हा एकमेव देश आहे जिथे दोन राष्ट्रपती कार्यरत असतात, ही खूपच अनोखी गोष्ट आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सॅन मारिनोमध्ये दर सहा महिन्यांनी दोन कॅप्टन-रीजेंट राष्ट्रप्रमुखांची निवड केली जाते.
युरोपमधील सॅन मारिनो देशाला सर्वात प्राचीन प्रजासत्ताकांपैकी एक मानले जाते, ज्याचा इतिहास अतिशय जुना आहे.
सॅन मारिनोमध्ये कॅप्टन-रीजेंट प्रणालीची सुरुवात १२४३ मध्ये झाली आणि ती परंपरा आजही सुरू आहे.
तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सॅन मारिनोमधील संसदेला ‘अरेंगो’ या खास नावाने ओळखले जाते.
१३ व्या शतकात प्रत्येक कुटुंबप्रमुख संसद सदस्य निवडत होता, मात्र कालांतराने ही पद्धत बदलली गेली, असं अहवालात म्हटलंय.
सॅन मारिनो हा आकाराने छोटा असून, तो जगातील सर्वात लहान देशांपैकी एक मानला जातो.