ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नुकतंच अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात अनेकांचा मृत्यू झाला
अनेकदा एखादा मोठा पक्षी विमानाला आदळल्याने देखील अपघात झाल्याचं आपण ऐकलं असेल.
पण तुम्हाला माहितीये का विमान उड्डाड करण्यापूर्वी त्याच्या इंजिनमध्ये चक्क जिवंत कोंबडीला टाकलं जातं.
प्रत्यक्षात विमानाच्या इंजिनांवर पक्षी आदळल्यास काय होतं हे तपासण्यासाठी या प्रकारची चाचणी केली जाते.
विमान कंपन्या उड्डाण करण्यापूर्वी ‘चिकन गन’ चाचणी करतात. यामध्ये उड्डाण करण्यापूर्वी इंजिनमध्ये जिवंत कोंबडी टाकली जाते.
पक्ष्यांच्या टक्करचा विमानावर कसा परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी इंजिनिअर चिकन गन नावाच्या एका विशेष मशीनचा वापर करतात.
कोंबडीचा वेग खऱ्या पक्ष्यांच्या टक्करीच्या वेगाइतकाच असतो. ज्यामुळे टक्कर झाल्यानंतर किती नुकसान होतं हे समजण्यास मजा येते.