Why coconut broken: कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी नारळ का फोडला जातो?

Surabhi Jayashree Jagdish

coconut breaking Hindu rituals

  1. नारळ फोडण्याची परंपरा

घरात कोणतंही शुभ काम सुरू करण्यापूर्वी नारळ फोडला जातो. ही प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक विधींमध्ये याला महत्त्व आहे.

coconut breaking Hindu rituals

का फोडतात नारळ?

नारळच का फोडतात असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. या परंपरेमागचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता असते. यामागे धार्मिक अर्थ दडलेला आहे.

significance of coconut offering

शुभतेचं प्रतीक

शुभ कामापूर्वी नारळ फोडणे शुभ मानलं जातं. ते समृद्धी आणि चांगल्या सुरुवातीचं चिन्ह समजलं जातं. यामुळे कार्य निर्विघ्न पार पडावं अशी भावना व्यक्त होते.

coconut breaking before puja

त्रिदेवांचे प्रतीक

नारळाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचं प्रतीक मानलं जातं. म्हणून त्याला पूजेत विशेष स्थान दिलं जातं. तो पवित्र अर्पण मानला जातो.

coconut as sacred fruit

गणपती

नारळ हे गणपती बाप्पाचं आवडतं फळ मानलं जातं. नारळातील पाणी पवित्रतेचं प्रतीक समजलं जातं. म्हणून पूजाविधीत त्याचा वापर केला जातो.

coconut ritual meaning

स्वच्छतेचं प्रतीक

नारळातील पांढरी गर आत्म्याच्या स्वच्छतेचं प्रतीक मानलं जातं. नारळ फोडणं म्हणजे अहंकार सोडण्याचा संदेश दिला जातो. ही कृती नम्रतेची जाणीव करून देते.

coconut breaking tradition India

चांगली सुरुवात

नारळ फोडताना कार्य यशस्वी होण्यासाठी प्रार्थना केली जाते. अडथळे दूर राहावेत अशी भावना व्यक्त केली जाते. लग्न आणि गृहप्रवेशात तो मंगल सुरुवातीचं प्रतीक असतो.

coconut symbolism in Hinduism

Spicy curry chutney: जेवताना तोंडी लावायला काहीतरी हवंय? मग १० मिनिटात बनवा ही झणझणीत कडीपत्त्याची चटणी

येथे क्लिक करा