ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
थायलंड हे भारतीयांचे आवडते ठिकाण आहे. आकडेवारीनुसार 2024 मध्ये 21 लाख भारतीयांनी थायलंडला भेट दिली. भारतीयांना पुन्हा पुन्हा थायलंडला भेट द्यायला आवडतं.
भारतीयांना थायलंड इतके आवडते याची एक-दोन नाही तर अनेक कारणे आहेत. जाणून घ्या.
थायलंडमध्ये भारतीयांना व्हिसा ऑन अराइव्हलची सुविधा मिळते. विमानतळावरुनच व्हिसा 15 ते 30 दिवसांसाठी उपलब्ध आहे. ऑनलाईन व्हिसाची सुविधा देखील आहे.
कमी बजेटमध्ये थायलंडची ट्रिप करु शकतो. 4-5 दिवसांची थायलंड ट्रिप 25 ते 40 हजार रुपयांमध्ये करता येते.
थायलंडचे नाईटलाइफ खूप लोकप्रिय आहे. पटाया आणि बँकॉक हे ग्रुप टूर, बॅचलर पार्टी आणि सहकाऱ्यांसोबत प्रवास करणाऱ्यांसाठी खूप खास ठिकाण आहेत.
थायलंडचे मार्केट आणि अन्न देखील भारतीयांना आकर्षित करते. चाटुचक मार्केट, एमबीके मॉल, पटाया येथील लोकल मार्केट आणि खास पदार्थ भारतीयांना आवडतात.
थायलंडमध्ये, भारतीयांना समुद्र, बेट आणि निसर्गाचा संगम पाहण्याची संधी मिळते. पटाया, फुकेत आणि क्राबी सारख्या समुद्रकिनाऱ्यांवर हत्ती सफारी आणि वॉटर स्पोर्टस लोकप्रिय आहे.