Manasvi Choudhary
नवरा - बायकोचे नाते हे प्रेमाचे असते. या नात्यात एकमेकांच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असतात. एकमेकांच्या गोष्टी देखील वापरल्या जातात.
मात्र तुम्हाला माहितीये का? नवरा- बायकोच्या काही सवयी गंभीर ठरू शकतात. नवरा बायकोने स्वत:च्या छोट्या छोट्या सवयींकडे बारकाईने लक्ष देणे महत्वाचे आहे.
नवरा- बायकोने एकमेकांचे टॉवेल वापरणे ही देखील वाईट सवय आहे. जे आरोग्यासाठी घातक ठरते.
टॉवेलमध्ये ओलावा, बॅक्टेरिया, बुरशी वाढण्याचे प्रमाण अधिक असते अशावेळी जर तुम्ही टॉवेल इतरांसोबत शेअर करत आहात तर ते आरोग्यासाठी धोकादायक आहे.
प्रत्येकांची त्वचा ही वेगवेगळी असते जर तुम्हीदेखील एकमेकांचे टॉवेल वापरत असाल तर जळजळ, संसर्ग होऊ शकतात.
पुरळ, खाज सुटणे, फोडया येणे, लाल चटा उमटणे हे एकमेकांचे टॉवेल वापरल्याने होते. एकच टॉवेल सतत वापरल्याने त्यामध्ये जतूंची संख्या वाढते आणि यामुळेच आरोग्या समस्या उद्भवतात.
एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीच्या त्वचेवर संसर्ग पसरू शकतो. टॉवेलमधील दमट वातावरण बुरशीच्या वाढीसाठी पोषक असते, ज्यामुळे त्वचेला संसर्ग होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.