ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कोणत्याही रुग्णालयात तुम्ही पाहिलं असेल की तेथील बेडशीट किंवा पडदे हिरव्या किंवा निळ्या रंगाचे असतात.
ऑपरेशन थिएटरमध्ये नेहमी गदड हिरव्या रंगाची बेडशीट वापरली जाते. यामागचं कारण काय, जाणून घ्या.
हिरवा रंग ताण कमी करण्यासाठी वापरला जातो, म्हणून डॉक्टर देखील हिरव्या रंगाचे कपडे घालतात.
रुग्णांच्या आणि डॉक्टरांच्या डोळ्यांना आराम मिळण्यासाठी आयसीयूमध्ये हिरवे पडदे लावले जातात.
हिरव्या रंगामुळे डॉक्टरांना काम करणे सोपे होते. यामुळे रक्त रंग पाहण्यास सोपे होते.
हिरवा रंग रुग्णांसाठी शांत आणि आरामदायी वातावरण निर्माण करण्यास मदत करतो.
म्हणूनच ऑपरेशन थिएटरमध्ये हिरव्या रंगाची बेडशीट आणि पडदे वापरतात.