Manasvi Choudhary
आपण एखाद्या रिक्षात किंवा एखाद्या स्कूटीवर प्रवास करत असताना समोरून जाणाऱ्या ट्रकच्या मागे 'Horn Ok Please' असं लिहिलेलं तुम्ही अनेकदा पाहिलं, वाचलं असेल.
पण कधी तुमच्या मनात हा प्रश्न आला आहे का की, ट्रकवर 'Horn Ok Please' असं का लिहिलेलं असेल? हा काही वाहतुकीचा कोणता नियम आहे का? तर या विषयी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
ट्रकच्या मागे 'Horn Ok Please' असं लिहण्यामागचे कारण म्हणजे, पूर्वी जुन्या पद्धतीच्या ट्रकला बाजूला आरसे नसायचे, अशावेळी चालकाल मागून कोणते वाहन येते होते हे पाहणे अशक्य होते.
ही समस्या सोडवण्यासाठी ट्रकच्या मागच्या बाजूला 'Horn Ok Please' असं लिहायचे. तसेच तुम्हाला ओव्हरटेक करायचे असेल तर कृपया तुम्ही हॉर्न वाजवा असा संकेत देण्यासाठी 'Horn Ok Please' चा वापर व्हायचा.
तर असे म्हटले जाते की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्यामुळे ट्रकवर 'On Kerosene' म्हणजेच याचा शॉर्ट फॉर्म 'OK' लिहिले जायचे, जेणेकरून लोकांनी सुरक्षित अंतर ठेवावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.