ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेक प्रकरणांमध्ये असे दिसून आले की, जिममध्ये व्यायाम करताना अचानक लोकांना हार्ट अटॅक येतो.
जिममध्ये व्यायाम करताना हार्ट अटॅक येण्याचे मुख्य कारण कोणते, जाणून घ्या.
जिममध्ये जास्त प्रमाणात व्यायाम केल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो.
जिममध्ये ट्रेडमिलवर क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने हार्ट अटॅक येऊ शकतो.
व्यायाम करताना आपल्या क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलल्याने हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.
ताणतणाव आणि झोप पूर्ण न होता जिममध्ये व्यायाम केल्यास हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.
दोन सेटच्यामध्ये विश्रांती न घेता किंवा संपूर्ण व्यायाम करताना विश्रांती न घेता सलग व्यायाम केल्याने देखील हार्ट अटॅक येऊ शकतो.