Skin: जास्त वेळ पाण्यात राहिल्यानंतर त्वचा आकुंचन का पावते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचेचे आकुंचन होणे

जास्त वेळ हात पाण्यात राहिल्यास बोटांवरील त्वचा आकुंचन पावते. यामागील कारण कोणते, जाणून घ्या.

skin | google

त्वचेची रचना

त्वचेच्या बाहेरील थराला एपिडर्मिस म्हणतात आणि त्यात केराटिन असते. ते पाणी शोषून घेते. त्वचेचा खालचा थर, डर्मिस, नसा आणि रक्तवाहिन्यांनी भरलेला असतो.

skin | google

पाणीचा परिणाम

जेव्हा तुम्ही बराच वेळ पाण्यात राहता तेव्हा तुमच्या त्वचेचा बाह्य थर पाणी शोषून घेतो. तो फुगू लागतो, परंतु खालचा थर घट्ट राहतो. यामुळे त्वचा आकुंचन पावते आणि सुरकुत्या दिसतात.

skin | google

नसांवर नियंत्रण

मज्जासंस्था त्वचेला पाण्याच्या संपर्कात आल्यावर रक्तवाहिन्यांना आकुंचन पावण्याचे संकेत देते, ज्यामुळे त्वचेच्या बाहेरील भागावर सुरकुत्या तयार होतात.

skin | google

नैसर्गिक प्रक्रिया

शास्त्रज्ञांच्या मते, त्वचा आकुंचन पावणे नैसर्गिक असून याचे अनेक फायदे देखील आहेत. यामुळे ओल्या दगडांवर चालणे किंवा वस्तू धरणे यांची पकड सुधारते.

skin | google

ऑस्मोसिस आणि त्वचा

ऑस्मोसिसमुळे त्वचेच्या बाहेरील थरात पाणी शिरते. केराटिन पेशी पाणी शोषून घेतात आणि फुगतात, ज्यामुळे त्वचा आकुंचन पावते आणि सुरकुत्या पडतात.

skin | google

फक्त बोटांनाच असे का होते?

आकुंचन फक्त ग्लबरस त्वचेत जसे की बोटे आणि तळहातावरच होते, जिथे केस नसतात. येथील, मज्जासंस्था अधिक संवेदनशील असते, ज्यामुळे त्वचा लगेच आकुंचन पावते.

skin | google

NEXT: 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध, असू शकतं पोटाचा कॅन्सर

Stomach Cancer | saam tv
येथे क्लिक करा