ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पण अनेकदा पोटदुखीला किरकोळ मानतो, परंतु काही लक्षणे पोटाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
जर वारंवार उलट्या किंवा मळमळ होत असेल तर दुर्लक्ष करु नका. हे पोटात कॅन्सरच्या पेशी तयार होण्याचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
जर तुम्हाला पोटात जडपणा जाणवत असेल किंवा थोडेसे जेवण केल्यानंतर भूक लागत नसेल तर हे वाढत्या ट्यूमरचे लक्षण असू शकते.
जर कोणतेही प्रयत्न न करता वजन झपाट्याने कमी होत असेल तर हे पोटाच्या कॅन्सरचे लक्षण आहे.
जर तुम्हाला तुमच्या उलट्या किंवा विष्ठेमध्ये वारंवार रक्त येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे पोटाच्या कॅन्सरचे गंभीर लक्षण असू शकते.
कॅन्सरच्या पेशी शरीरातील ऊर्जा शोषून घेतात, ज्यामुळे पोटभर जेवण केल्यानंतरही व्यक्तीला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
जर सतत अपचन किंवा अॅसिडिटी होत असेल आणि औषधे घेऊनही बरे होत नसेल तर हे गंभीर आजाराचे लक्षण आहे.