ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रात्रीची चांगली झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे, परंतु जास्त झोप तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
अनियमित झोप आणि दीर्घकाळ झोप घेतल्याने बल्ड शुगर लेव्हलवर परिणाम होऊ शकतो आणि टाइप २ मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
जास्त वेळ झोपल्याने तुमचे मेटाबॉलिजम रेट मंदावते, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो.
जास्त झोप हृदयाला कमकुवत करू शकते. रिपोर्टनुसार, जे लोक दिवसातून ९-१० तासांपेक्षा जास्त झोपतात त्यांना हृदयरोगाचा धोका वाढतो.
जास्त झोप येणे हे बहुतेकदा डिप्रेशन आणि मूड स्विंगशी जोडलेले असते. नियमित झोपण्याची वेळ आणि योग्य वेळी उठल्याने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करू शकते.
जास्त झोप शरीराची रोगप्रतिकार शक्ती मंदावू शकते. पुरेशी झोप आणि संतुलित आहार तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतो.
जास्त झोपेमुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि सांधेदुखीचा त्रास वाढू शकतो.