ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भारत सरकारने लाँच केलेले काही सरकारी अॅप्स तुमच्या दैनंदिन जीवन सोयीस्कर करण्यात मदत करु शकतात.
उमंग अॅपद्वारे तुम्ही पासपोर्ट, गॅस बुकिंग, वीज, पाणी बिल, ईपीएफ इत्यादी सरकारी सेवांचा लाभ घेऊ शकता.
तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे डिजीलॉकरद्वारे डिजिटल स्वरूपात साठवू शकता.
एम परिवहनच्या मदतीने तुम्ही तुमच्या वाहनाची नोंदणी माहिती मिळवू शकता.
माय स्कीमचा वापर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना शोधण्यासाठी करता येतो.
जर तुम्हाला सरकारी सिक्युरिटीज किंवा बाँडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर रिझर्व्ह बँकेचे आरबीआय रिटेल डायरेक्ट अॅपद्वारे तुम्ही थेट सरकारी बाँड खरेदी करू शकता.
डिजी यात्रा अॅपमुळे चेहऱ्याची ओळख करून विमानतळांवर लवकर प्रवेश करणे शक्य होते, ज्यामुळे चेक-इन आणि सुरक्षा तपासणी जलद होते.