Saam Tv
हिंदू धर्मात लग्नापूर्वी वधू-वरांच्या मनगटावर हळकुंड बांधण्याची प्रथा आहे.
लग्नाआधी मुहूर्त करणे, हळकुंड फोडणे,असे काही विधी घरातील महिला करतात.
तसेच लग्नाच्या आधी हळद लावणे, घाणा भरणे, ग्रहमख असे विधी करण्याची प्रथा सुद्धा प्रथा आहे.
पण सोशल मीडियावर सध्या मनगटाव हळकुंड बांधून फोटो शेअर करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.
वधू-वरांच्या मनगटावर हळकुंड बांधला जातो. याचं नेमकं कारण आज आपण जाणून घेणार आहोत.
लग्नाच्या 1-2 दिवस आधी वधू-वरांच्या मनगटावर हळकुंड बांधला जातो.
यामुळे लग्न होणाऱ्या जोडप्याचं नकारात्मक शक्ति आणि वाईट नजरेपासून संरक्षण होतं असं मानलं जातं.
लग्न झाल्यावर नवरा- नवरीच्या गृहप्रवेशानंतर हे हळकुंड सोडवलं जातं.