साम टिव्ही
सोन्याचा रंग पिवळा का असतो? तो दुसऱ्या रंगाचा का नसतो? याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होत असतात.
अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या थेरीत काय लपलंय?
या सोन्याचा रंग पिवळाच का असतो, याच कारण जगप्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या थेरीत लपलं आहे.
क्वांटम तंत्रज्ञानानुसार, अणूचे इलेक्ट्रॉन कक्षेत स्थिर असतात. हे धातू चमकणारे असतात. त्यात अणूतील इलेक्टॉन्समध्ये वेगवेगळी उर्जा असते.
सोन्याच्या धातूजवळ इलेक्ट्रोन मोठ्या प्रमाणात असतात. इलेक्ट्रोन धातूच्या चारही बाजूने फिरत असतात.
अल्बर्ट आइनस्टाइन यांचा सापेक्ष सिद्धांत सांगतो की, गती वाढते, त्यानुसार इलेक्ट्रॉनचं द्रव्यमान वाढतं. त्यामुळे इलेक्ट्रॉनला ऑर्बिटलमध्ये पाठवण्यासाठी लागणारी उर्जा कमी होते. त्यामुळे कमी उर्जेचे निळे फोटॉन तयार होतात. सोने त्याला परावर्तित करत नाही.
सोन्यामध्ये प्रकाश अवशोषित होतो, पुन्हा उत्सर्जित होतो. या प्रकाशात तरंग दिसतात. त्यात निळा, वांगी रंग कमी असतो.
पिवळा, नारंगी, लाल दिव्याची तरंगलांबी निळ्या प्रकाशापेक्षा जास्त असल्याने सोने पिवळे दिसते.
Next : मधूमेह नियंत्रण करण्यासाठी आवळा गुणकारी; जाणून घ्या फायदे