Chinchoti Waterfall: लांब कशाला जाताय! मुंबईच्या अगदी तासभर अंतरावर आहे हा धबधबा; या विकेंडला नक्की प्लान करा

Surabhi Jayashree Jagdish

चिंचोटी धबधबा

मुंबईजवळच्या वसई-विहार भागात असलेला चिंचोटी धबधबा हा एक सुंदर आणि लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला ट्रेकिंग करावं लागेल.

वसई रोड स्टेशन

या धबधब्यावर पोहोचण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी तुम्ही वसई रोड स्टेशनवर पोहोचावं लागेल.

स्टेशनवरून असं जाल

स्टेशनवर उतरल्यानंतर, तुम्हाला बाहेरगावी जाणाऱ्या एसटी बस किंवा ऑटो-रिक्षा मिळतील. तुम्ही ऑटो-रिक्षा किंवा खासगी टॅक्सी करून चिंचोटी गावाकडे प्रवास करू शकता. हे अंतर सुमारे ११ किलोमीटर आहे.

स्वतःच्या गाडीने कसं जालं?

जर तुम्ही स्वतःच्या गाडीने जात असाल, तर तुम्ही थेट मुंबई-अहमदाबाद हायवे (NH 48) वरून वसईकडे जाऊ शकता. वसई रोड स्टेशनवरून वसई-चिंचोटी मार्ग घेऊन तुम्ही थेट चिंचोटी गावापर्यंत गाडीने जाऊ शकता.

ट्रेकिंगचा मार्ग

चिंचोटी गावातून पुढे धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला सुमारे ३ किलोमीटरची पायवाट चालावी लागेल. ही वाट जंगलातून जाते आणि वाटेत तुम्हाला लहान-मोठे ओढे पार करावे लागतात.

नैसर्गिक सौंदर्य

चिंचोटी धबधबा एका घनदाट जंगलाच्या मधोमध आहे. त्यामुळे, इथे तुम्हाला हिरवीगार झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट आणि शांतता अनुभवायला मिळते.

अखंड प्रवाह

हा धबधबा साधारणपणे वर्षभर वाहतो, पण पावसाळ्यात (जून ते सप्टेंबर) त्याची खरी शोभा पाहायला मिळते. या काळात तो पूर्ण क्षमतेने कोसळतो.

Kandivali Tourism: लांब जाऊच नका! कांदिवलीमध्येच आहेत 'हे' Hidden Spots, या विकएंडला नक्की जाऊन या

Kandivali Tourism | saam tv
येथे क्लिक करा