Manasvi Choudhary
आजकाल पुरूष आणि महिला दोन्हींही रोज जीन्स पॅन्ट परिधान करतात. बदलत्या काळानुसार पुरूषांप्रमाणमेच महिलांच्या आवडीचा पोशाख जीन्स बनला आहे.
बाजारात नवनवीन जीन्सचे पॅटर्न्स आहेत. स्किनी जीन्स, सिगारेट जीन्स, बेल बॉटर्म जीन्स, स्ट्रेट कट जीन्स हे जीन्सचे हटके पॅटर्न्स आहेत.
जिन्सच्या हटके फॅशन आल्या तरी प्रत्येक जीन्समध्ये पुढची चैन (झिप), खिसे आणि बटणे ही स्टाईल बदललेली दिसत नाही. यानुसार पुरूषांप्रमाणे महिलांच्याही जीन्सलाही पुढे चैन (झिप) असते.
यानुसार महिलांच्या जीन्सला पुढे चैन (झिप) का असते. यामागचे कारण या वेबस्टोरीतून समजून घ्या.
सुरूवातीला जेव्हा पुरूषांप्रमाणेच महिलांसाठी जीन्स बनवायला सुरूवात झाली तेव्हा कपड्यांचे डिझाईन आणि मेकिंग सोपे राहावे म्हणून तीच रचना महिलांच्या जीन्ससाठीही वापरली गेली.
जीन्सचे कपडे हे अत्यंत घट्ट असतात यामुळे महिलांच्या कंबरेचा भाग किंवा हिप्सचा आकार लक्षात घेता, जर पुढे चैन नसेल तर घट्ट जीन्स घालणे किंवा काढणे अत्यंत कठीण आणि त्रासदायक होते यासाठी महिलांच्या जीन्स पुढे चैन असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.