Manasvi Choudhary
सध्या सर्वत्र Gen Z ची चर्चा सुरू आहे. सोशल मीडियाचा प्रभाव, बदललेली जीवनशैली, डिजिटल युगात वाढलेली ही पिढी यामुळे Gen Z सध्या चर्चेत आहे.
१९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेल्या पिढीला Gen Z ओळखले जातात. Gen Z ही पहिली पिढी आहे जी पूर्णपणे डिजिटल युगात जन्माला आली आणि वाढली त्यामुळे सध्या यांची चर्चा आहे.
पूर्वी लोक मानसिक ताणतणाव किंवा डिप्रेशन या विषयावर उघडपणे बोलत नसायचे. परंतु, Gen Z या विषयाबाबत अत्यंत मोकळेपणाने, बिनधास्तपणे बोलतात. ते आपल्या भावना लपवत नाहीत, गरज पडल्यास थेरपी घेतात आणि मानसिक आरोग्याला जपतात.
पूर्वी एकाच नोकरीत वर्षानुवर्षे आयुष्य काढत असत. पण Gen Z यांना असे आवडत नाही. त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्य आणि स्वातंत्र्याला महत्त्व देतात.
जुन्या पिढीला प्रगतशील तंत्रज्ञान शिकून घ्यावे लागले, पण Gen Z साठी हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कसे वापरावे, नवीन गॅजेट्स कसे वापरायचे हे त्यांना अचूक माहिती असते.
नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय फ्रीलान्सिंग किंवा कंटेंट क्रिएशन करून स्वंतत्र काम करतात. नवनवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याची त्यांची तयारी असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.