Saam Tv
तुम्ही दिवसभर ठिक असता पण संध्याकाळ होताच तुम्हाला ताप येत असेल तर हे लक्षण गंभीर आहे.
यावर बिरला हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार तायल यांनी खूप महत्वपुर्ण माहिती दिली आहे. त्यात याची दोन कारणे सांगितली.
संध्याकाळी ताप येण्याचे नॅचरल कारण म्हणजे शरीरात होणारे हार्मोनल बदल आहे.
दुसरे कारण म्हणजे फिजीकल अॅक्टीविटी जास्त झाली असेल किंवा पाणी कमी प्यायलात तर तुम्हाला संध्याकाळी ताप येऊ शकतो.
जर तुम्हाला खूप ताप आला असेल तर तुम्ही त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. हे लक्षण टीबीचे सुद्धा असू शकते.
तुम्ही दिवसातून किमान ३ लीटर पाणी प्यावे. त्याने तुम्हाला या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.