Manasvi Choudhary
लग्नानंतर महिलांनी नोकरी करावी की नाही? हा स्वत:चा वैयक्तिक निर्णय आहे.
मात्र सध्याच्या काळानुसार महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे कुटुंबासाठी आणि समाजासाठी अत्यंत फायद्याचे आहे.
लग्न झालेल्या महिलेने नोकरी केल्यास ती आर्थिकदृष्ट्या सक्षम असते.
नोकरीमुळे तिला स्वतःच्या कष्टाने मिळालेले नाव आणि आदर मिळतो, जो तिला मानसिक समाधान देतो.
जेव्हा एखादी महिला स्वतः पैसे कमावते, तेव्हा तिचा आत्मविश्वास वाढतो.
लग्नानंतर वैवाहिक जीवनात कोणतीही आर्थिक चणचण भासत नाही.
लग्नानंतर नोकरी केल्यानंतर महिलेच्या ज्ञानात भर पडते.