Manasvi Choudhary
डेली युजसाठी साडी निवडताना ती वजनाला हलकी, आरामदायक आणि दिसायला स्टायलिश असणे महत्त्वाचे असते.
डेली युजसाठी साडीच्या लेटेस्ट ट्रेडिंग डिझाईन कोणत्या आहेत ते पाहूया.
फ्लोरल प्रिंटेड शिफॉन या साड्या अत्यंत हलक्या आणि मुलायम असतात. मोठ्या फुलांचे किंवा नाजूक फुलांचे डिझाईन्स सध्या खूप ट्रेन्डमध्ये आहेत.
जर तुम्हाला सोबर आणि प्रोफेशनल लूक हवा असेल, तर लिनन साडी उत्तम आहे. या साड्या घाम शोषून घेतात आणि कॉर्पोरेट किंवा ऑफिस लूकसाठी बेस्ट आहेत.
रेट्रो लूक पुन्हा फॅशनमध्ये आला आहे. पांढऱ्या किंवा काळ्या बेसवर मोठे पोल्का डॉट्स किंवा उभे पट्टे असलेल्या साड्या तुम्हाला स्लिम आणि उंच दाखवतात.
कमी किंमतीत 'रॉयल' लूक हवा असेल तर प्लेन सॅटीन साड्या निवडा. या साड्यांना एक विशिष्ट चमक असते, जी डेली वेअरमध्येही तुम्हाला ग्लॅमरस लूक देते.
पारंपारिक आणि आधुनिकतेचा संगम म्हणजे बांधणी प्रिंट. जॉर्जेट फॅब्रिकमुळे ही साडी सांभळायला सोपी जाते आणि दिसायला अत्यंत रंगीबेरंगी आणि फ्रेश वाटते.