Mobile Tips: तुमचा फोन इतक्या लवकर खराब का होतो? जाणून घ्या कारणे आणि टिप्स

Dhanshri Shintre

मोबाईल लवकर खराब

काही चुकीच्या सवयी तुमचा मोबाईल लवकर खराब करू शकतात. कोणत्या सवयींमुळे डिव्हाइसची आयुष्य कमी होते, ते जाणून घेऊया.

झोपण्यापूर्वी मोबाईल चार्जिंग

रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल चार्जिंगला लावल्याने आणि रात्रभर चार्जिंग केल्यास बॅटरीवर नकारात्मक परिणाम होतो, ज्यामुळे तिची आयुष्यकाल कमी होऊ शकते.

मूळ चार्जर

मोबाईल फक्त मूळ चार्जर वापरून चार्ज करा; दुसऱ्या कंपनीचा किंवा स्थानिक चार्जर वापरल्यास फोन खराब होण्याची शक्यता आणि बॅटरीची आयुष्य कमी होऊ शकते.

बॅटरी शून्यावर पोहचवू नका

मोबाईलची बॅटरी पूर्णपणे शून्यावर पोहोचल्यावर चार्ज करण्याची सवय टाळा, अन्यथा बॅटरीचे आयुष्य कमी होऊन फोन पटकन खराब होऊ शकतो.

नकली केबलने फोन चार्ज

मूळ केबल खराब झाल्यावर स्वस्त किंवा नकली केबलने फोन चार्ज करणे टाळा, अन्यथा बॅटरी किंवा फोनचे इलेक्ट्रॉनिक भाग खराब होण्याची शक्यता वाढते.

वाईट सवयी

मोबाईलचे नुकसान टाळण्यासाठी तुमच्या वाईट सवयी ताबडतोब बदला. अन्यथा फोन लवकर खराब होऊ शकतो आणि दुरुस्तीवर मोठा खर्च करावा लागू शकतो.

सल्ला

फोन चार्ज करताना नेहमी रिटेल बॉक्समधून आलेला मूळ चार्जर आणि केबल वापरा. कारण अन्य चार्जर वापरल्यास फोन आणि बॅटरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

NEXT: कोळ्यांना करा कायमचा रामराम! घरच्या घरी ट्राय करा 'हे' उपाय

येथे क्लिक करा