Dhanshri Shintre
दिवाळी अगदी तोंडावर आली असतानाच बहुतांश घरांमध्ये साफसफाईची लगबग सुरूच आहे. काही घरांमध्ये सफाई झाली सुद्धा असेल.
पण अनेकदा आपण घर स्वच्छ करून घेतल्यानंतर काही दिवसांतच भिंतींवर पुन्हा कोळी जाळं विणतात.
घरांच्या कोपऱ्यात जळमट दिसतात. हे केवळ घराचं सौंदर्य बिघडवत नाहीत.
अशा वेळी काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही कोळ्यांपासून कायमस्वरूपी सुटका मिळवू शकता. चला जाणून घेऊ या हे सोपे उपाय.
तुमचं घर स्वच्छ करूनही वारंवार कोळी जाळ विणत असतील तर त्यांना घरापासून कायमच दूर ठेवण्यासाठी पुदिन्याचं तेल खूप प्रभावी ठरतं.
कोळ्यांना कायमचं घराबाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी व्हिनेगर उत्तम उपाय आहे. व्हिनेगर आणि पाणी एकत्र करून स्प्रे बाटलीत भरा. भिंतींवर किंवा कोपऱ्यांवर स्प्रे करा.
लिंबाचा आंबटपणा कीटकांना दूर ठेवतो. त्यामुळे लिंबाच्या साली कोळ्यांपासून सुटका मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
लिंबाप्रमाणे संत्र देखील कोळ्यांच्या जाळ्यांवर प्रभावी उपाय ठरू शकतो.
अशा प्रकारे हे सोपे नैसर्गिक उपाय अवलंबून तुम्ही दिवाळीपूर्वी घरातील कोळ्यांना कायमचा निरोप देऊ शकता आणि स्वच्छ, सुंदर घराचा आनंद घेऊ शकता.