Dhanshri Shintre
दिवाळी सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप किंवा घरगुती वस्तू खरेदी केल्यास तुम्ही मोठ्या सवलतींचा लाभ घेऊन हजारो रुपयांची बचत करू शकता.
विजय सेल्सने आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या असून, त्यात ४३ इंचाचा स्मार्ट टीव्ही केवळ १६,४९० रुपयांच्या विशेष किमतीत खरेदी करता येणार आहे.
आयफोन एअर दिवाळी सेलमध्ये १,११,९०० रुपयांना मिळणार असून, खरेदीवर ४,००० रुपयांचा कॅशबॅक आणि ४,००० रुपयांचा कूपन डिस्काउंट दिला जाणार आहे.
नथिंग फोन ३ दिवाळी सेलमध्ये ४४,९०० रुपयांत मिळणार असून, खरेदीवर ५,००० रुपयांचा कॅशबॅक दिला जाणार आहे; तसेच स्वयंपाकघरातील उपकरणे अपग्रेड करण्याची संधीही आहे.
दिवाळी सेलमध्ये मॅकबुक एअर एम४ केवळ ८०,९०० रुपयांच्या प्रारंभिक किमतीत मिळणार असून, ग्राहकांना यावर १०,००० रुपयांची विशेष सूट मिळणार आहे.
दिवाळी सेलमध्ये OnePlus 13R फक्त 38,999 रुपयांना मिळणार आहे. बँक ऑफर्स आणि कूपन डिस्काउंटचा लाभही मिळेल. ऑफर्स 31 ऑक्टोबरपर्यंत वैध आहेत.
दिवाळी सेलमध्ये स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. अलीकडील जीएसटी कपातीमुळे विशेषतः मोठ्या स्क्रीन टीव्ही खरेदीत ग्राहकांना मोठा फायदा होईल.
स्वयंपाकघरातील उपकरणांमध्ये एअर फ्रायर ₹२,२०९ पासून आणि वॉशिंग मशीन ₹९,३९० पासून खरेदी करता येतील, दिवाळी सेलमध्ये विशेष सवलतीसह उपलब्ध आहेत.
एचडीएफसी डेबिट आणि क्रेडिट कार्डवर खरेदी केल्यास ₹७,५०० पर्यंत सूट मिळेल, तर अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवर ₹२०,००० पर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे.