Manasvi Choudhary
उन्हाळ्याच्या अनेक मुली व मुले चेहऱ्यावर सनस्क्रिन लावतात. उन्हापासून चेहऱ्याचे संरक्षण होण्यासाठी सनस्क्रिन फायदेशीर आहे.
मात्र सनस्क्रिन लावल्यानंतर चेहरा काळा दिसतो, असं तुम्ही अनेकांच्या तोंडून ऐकलं असेल. सनस्क्रिन लावताना काही चुका केल्याने त्वचेवर परिणाम होतो.
उन्हाळ्यात सूर्याच्या UVA आणि UVB किरणांमुळे त्वचेला नुकसान पोहचते. UVA किरणांमुळे त्वचा काळी दिसते.
सनस्क्रिन योग्य प्रमाणात व योग्य वेळा न लावल्यामुळे त्वचेचे संरक्षण होऊ शकत नाही.
चेहरा आणि मानेसाठी योग्य प्रमाणात सनस्क्रिन लावणे महत्वाचे आहे. जास्त सनस्क्रिन चेहऱ्यावर लावल्याने चेहरा काळा दिसतो.
उन्हाळ्यात घरातून बाहेर जाण्यापूर्वी किमान 15 ते 20 मिनिटे आधी सनस्क्रिन लावा.
जर तुम्ही जास्त वेळ उन्हात असाल तुम्हाला घाम येत असेल तर स्वच्छ तोंड धुवा आणि तर दोन तासांनी सनस्क्रिन लावा.
उन्हाळ्यात SPF 30 किंवा त्याहून अधिक असलेल्या ब्रॉड- स्पेक्टरम सनस्क्रिन वापरणे महत्वाचे आहे.
फक्त चेहऱ्यावर सनस्क्रिन न लावता तुम्ही मानेवर आणि हातांवर देखील सनस्क्रिन लावणे महत्वाचे आहे.