Manasvi Choudhary
डायबिटीज होऊ नये म्हणून अनेकजण शरीराची तपासणी करतात. शरीरातील ब्लड शुगर लेवल चेक करतात. साधारणपणे चाळीशी ओलांडली की डायबिटीजची काळजी घ्यावी लागते.
मात्र तुम्हाला माहितीये का? डॉक्टरांच्या मते, लहान मुलांमध्येही डायबिटीज होण्याची शक्यता वाढू लागली आहे.
पालकांनी लहान मुलांचेही ब्लड शुगर लेवल तपासणे महत्वाचे आहे. लहान मुलांचे ब्लड शुगर लेवल किती असणे तुम्हाला माहित असणे महत्वाचे आहे.
रिकाम्या पोटी लहान मुलांची ब्लड शुगर 70 ते 100 mg/dL इतके असावे. जेवण केल्यानंतर 140 mg/dL पेक्षा कमी असणे महत्वाचे आहे.
लहान मुलांची ब्लड शुगर लेवल कमी- जास्त होणे आरोग्यासाठी गंभीर मानले जाते.
शरीरातील ब्लड शुगर कमी झाल्यास लहानमुलांमध्ये थकवा, चक्कर , चिडचिडेपणा या समस्या उद्भवतात. ब्लड शुगर लेवल जास्त असेल तर डायबिटीज होण्याची संकेतं मिळतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.