Dhanshri Shintre
भूक लागणे स्वाभाविक आहे, पण जेव्हा पोटात बराच वेळ अन्न जात नाही, तेव्हा पोटात गडगडाट होणे ही सामान्य प्रतिक्रिया असते.
वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, भुकेमुळे पोटातून येणाऱ्या गुरगुर आवाजाला 'बोरबोरिग्मी' असे नाव देण्यात आले आहे, हे एक नैसर्गिक लक्षण आहे.
भूक लागल्यावर मेंदू पचनसंस्थेला अन्नाची गरज असल्याचा इशारा देतो, ज्यामुळे पोट-आतड्यांचे स्नायू आकुंचन पावतात आणि हालचाल निर्माण होते.
स्नायू आकुंचन आणि विश्रांतीच्या प्रक्रियेमुळे आतड्यांत वायू व पाचक रस हालचाल करतात, ज्यामुळे पोटात गुरगुरणारा नैसर्गिक आवाज निर्माण होतो.
पोट रिकामे असताना त्यात वायू आणि पाचक रस असतात, पण घन अन्न नसल्याने आवाज दाबला जात नाही आणि तो स्पष्ट ऐकू येतो.
सोप्या भाषेत सांगायचे तर, भूक लागल्यावर पचनसंस्था अन्नाची तयारी करते, वायू व पाचक रस हालचाल करतात आणि त्यामुळे पोटात आवाज ऐकू येतो.
भूक लागल्यावर शरीरातून 'घरेलिन' नावाचा हार्मोन स्रवतो, जो मेंदूपर्यंत सिग्नल पाठवतो की आता अन्नाची गरज आहे, त्यामुळे भूक लागते.