Nutrient Rich Foods: थकवा कमी करायचा आहे का? आहारात 'या' ८ गोष्टींचा नक्की समावेश करा

Dhanshri Shintre

पौष्टिक पदार्थ

ऊर्जा वाढवण्यासाठी आणि थकवा कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट करावेत असे आरोग्यदायी व पौष्टिक पदार्थ येथे जाणून घ्या.

ओट्स

ओट्समध्ये भरपूर फायबर आणि बी जीवनसत्त्वे असतात, जे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देण्यासाठी उपयोगी ठरतात.

केळी

केळीमध्ये नैसर्गिक साखर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी६ भरपूर असून ती त्वरीत ऊर्जा मिळवण्यासाठी उपयुक्त आहे.

पालक

पालक आणि केलमध्ये लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी भरपूर असेत, जे अशक्तपणामुळे होणारा थकवा दूर करण्यात मदत करते.

सुकामेवा

बदाम, अक्रोडमध्ये प्रथिने, मॅग्नेशियम व आरोग्यदायी चरबी असते, जे शरीराच्या उर्जा निर्मिती प्रक्रियेस मदत करतात.

ओमेगा-३

सॅल्मनमध्ये ओमेगा-३ आणि व्हिटॅमिन डी भरपूर असते, जे थकवा कमी करून उर्जेची पातळी सुधारतात.

अंडी

अंड्यामध्ये बी जीवनसत्त्वे, कोलीन आणि संपूर्ण प्रथिने असून मेंदूचे कार्य सुधारते आणि ऊर्जा मिळवायला मदत होते.

रताळे

रताळ्यांमध्ये फायबर, जटिल कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन ए आणि पोटॅशियम असून ते दीर्घकालीन ऊर्जा मिळवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

सब्जा

सब्जामध्ये फायबर, प्रथिने व ओमेगा-३ मुबलक प्रमाणात असते, जे शरीराला दीर्घकालीन ऊर्जा आणि हायड्रेशन देतात.

NEXT: फिटनेससाठी परफेक्ट! जाणून घ्या कोणते नाश्ते आहेत प्रथिनेयुक्त आणि शरीरासाठी फायदेशीर

येथे क्लिक करा