Dhanshri Shintre
सकाळचा नाश्ता वगळू नका; प्रथिनेयुक्त, पोषणमूल्य असलेला नाश्ता दिवसभर ऊर्जेसह कार्यक्षम ठेवतो.
रोज तोच नाश्ता कंटाळवाणा होतो, मग खा काहीतरी वेगळं, चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय निवडा.
सकाळी जिम करणाऱ्यांसाठी प्रथिनेयुक्त नाश्ता महत्त्वाचा असतो; योग्य प्रथिनं शरीराला ताकद व चपळता देतात.
रोजच्या एकसारख्या नाश्त्याला कंटाळा आला आहे? मग हे ६ प्रथिनेयुक्त, वेगळे आणि चविष्ट पर्याय ट्राय करा.
फक्त ५ मिनिटांत तयार होणारं अंड्याचं आमलेट चविष्ट आणि प्रथिनेयुक्त असतं, बनवायला अगदी सोपं आहे.
ऑम्लेट नको असेल तर सोपं आणि झटपट हाफ फ्राय बनवा; आरोग्यदायी आणि प्रथिनेयुक्त पर्याय आहे.
शेंगदाणे व भाज्यांसह बनवलेले पोहे चविष्ट, प्रथिनेयुक्त आणि आरोग्यदायी नाश्ता म्हणून रोज खाण्यास योग्य आहेत.
भाज्या घालून बनवलेला बेसनाचा चिल्ला चविष्ट, पोटभर आणि आरोग्यदायी नाश्ता म्हणून उत्तम पर्याय ठरतो.
जड आणि पोटभर नाश्ता हवा असल्यास पनीर पराठा उत्तम पर्याय; तो प्रथिनेयुक्त आणि चविष्ट असतो.
ओट्समध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात; नाश्त्यात गोड किंवा खारट ओट्स बनवून स्वादिष्टपणे खा.