Nippattu Recipe: नाश्त्यासाठी हटके पर्याय! नक्की ट्राय करा कर्नाटकी क्रिस्पी स्नॅक्स निप्पट्टू, वाचा रेसिपी

Dhanshri Shintre

निप्पट्टू

निप्पट्टू हे कुरकुरीत तळलेले भाताचे क्रॅकर्स असून कर्नाटकमधील पारंपरिक आणि लोकप्रिय स्नॅक्सपैकी एक आहेत.

कर्नाटकी क्रिस्पी स्नॅक्स

निप्पट्टू हे सणासुदीला किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला आवडीने खाल्ले जाणारे पारंपरिक कर्नाटकी क्रिस्पी स्नॅक्स आहेत.

साहित्य

शेंगदाणे, दालिया, सुके खोबरं, तांदळाचे पीठ, मैदा, रवा, तीळ, मीठ, लाल तिखट, कढीपत्ता, तेल.

बारीक वाटून घ्या

शेंगदाणे भाजा. मग त्यात दालिया व सुके खोबरे घालून मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक वाटून घ्या.

तांदळाचं पीठ आणि रवा

मिक्सिंग बाऊलमध्ये तांदळाचं पीठ टाका. हवं असल्यास त्यात चिरोटी रवा घालून छान एकत्र करून घ्या.

सगळे मिश्रण एकत्र करा

यानंतर एक टेबलस्पून मैदा, कुस्करलेले शेंगदाणे, तीळ, मीठ, तिखट आणि कढीपत्ता मिश्रणात घालून एकत्र करा.

तेल पीठामध्ये ओता

सर्व साहित्य एकत्र करा. कढईत १ टेबलस्पून तेल तापवा आणि गरम तेल पीठामध्ये ओता.

गोळे करा

पाणी घालून पीठ मळा. गोळे पसरवताना ओले कापड किंवा चर्मपत्र कागद वापरून सपाट करा.

पातळ पसरवा

कुरकुरीतपणा यावा म्हणून पीठ पातळ पसरवा आणि फुगू नये म्हणून वर हलक्याने काट्याने टोचा.

तळा आणि सर्व्ह करा

ते सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा, मग गरमागरम निप्पट्टू सर्व्ह करून आनंद घ्या.

NEXT: सँडविचला पर्याय शोधताय? मग आजच ट्राय करा गार्लिक चीज टोस्ट, वाचा रेसिपी

येथे क्लिक करा