Tanvi Pol
भारतीय लग्नात तुम्हाला वेगवेगळ्या प्रथा आणि परंपरा पाहण्यासाठी मिळतील.
आतंरपाठ आणि लग्नाच्या विधीही विविध असतात.
पण तुम्ही लग्नात नवरदेव आणि नवरीच्या मागे मामा लिंबू घेऊन उभा असलेला पाहिला असेल.
याचे नेमके कारण काय ते तुम्हाला माहिती आहे का?
आईचा भाऊ अर्थात मामा हा मुलीचा विशेष संरक्षक मानला जातो.
मामा हा आईच्या बाजूचा सर्वात जवळचा नातेसंबंधित असतो.
या सर्व कारणांमुळे लग्नाच्या वेळेस मामाची भूमिका खूप महत्त्वाची असते.