Indian wedding rituals: विवाह सोहळ्यात पहिली वरमाला वधूच का घालते?

Surabhi Jayashree Jagdish

भारतीय विवाह पद्धती

भारतीय विवाह पद्धतीत वरमाला किंवा जयमाल हा विधी केवळ औपचारिक नसून त्यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि मानसिक अर्थ आहे. अनेकांना प्रश्न पडतो की, माळ घालण्याची सुरुवात वधूकडूनच का होते?

वरमाला

वधु पहिल्यांदा वरमाला घालते यामागे स्त्रीचा सन्मान, स्वीकृती आणि पौराणिक परंपरा आहे. शास्त्र, लोकपरंपरा आणि कथा यातून या प्रथेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे.

वधूकडून स्वीकृतीचा संकेत

वधू वराला प्रथम माळ घालते, याचा अर्थ ती वराला पती म्हणून स्वीकारते. हा तिच्या संमतीचा संकेत मानला जातो. लग्न हे दोन व्यक्तींच्या परस्पर संमतीवर आधारित आहे, हे यातून दाखवलं जातं.

स्वयंवर परंपरा

प्राचीन काळी स्वयंवर पद्धत होती. ज्यामध्ये स्त्री स्वतः वराची निवड करायची. निवड झालेल्या पुरुषाच्या गळ्यात माळ घालण्याची परंपरा होती.

स्त्रीला दिलेला सन्मान

विवाहात स्त्रीला दुय्यम न मानता तिला सन्मान देण्याची ही पद्धत आहे. वधू पुढाकार घेते, यामधून तिचं महत्त्व अधोरेखित होतं. ‘लग्नाची सुरुवात स्त्रीकडून’ ही सकारात्मक भावना यात दडलेली आहे.

पौराणिक कथा

रामायणात माता सीतेने भगवान रामाला वर म्हणून स्वीकारलं. धनुष्य तुटल्यानंतर सीतेने रामाच्या गळ्यात माळ घातली. हीच घटना वरमालेच्या परंपरेचा पौराणिक आधार मानली जाते.

राधा-कृष्ण

कृष्णभक्तीत राधेने कृष्णाला प्रथम स्वीकारल्याचं प्रतीकात्मक वर्णन आढळतं. स्त्रीकडून प्रेम, समर्पण आणि स्वीकार आधी येतो, ही भावना यात आहे. वरमालेला भक्ती आणि प्रेमाचा अर्थ दिला जातो.

अहंकार नष्ट करण्याचा अर्थ

वधूने माळ घातल्यावर वर नम्रपणे स्वीकार करतो. यातून अहंकार त्यागून समानतेचा भाव निर्माण होतो.

कोणत्या भाज्यांमध्ये आल्याची पेस्ट वापरू नये?

येथे क्लिक करा