Saam Tv
आपण कष्ट करून पैसै कमावतो पण महिन्याच्या शेवटी हातात काहीच उरत नाही. वास्त्रुशास्त्रानुसार तुमच्या काही चुकांमुळे हातात लक्क्षी टिकत नाही. कळत नकळत या चुका तुम्हाला कंगाल करतात.
तुमच्या घरात जर गळका नळ असेल तर हे तुमच्या कंगाल होण्याचे लक्षण मानले जाते. गळका नळ अशुभ मानला जातो. जस थेंब थेंब पाणी वाया जाते, त्याप्रमाणे पैसा वाया जातो. त्यामुळे गळके नळ वेळीच दुरूस्त करा.
तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची वस्तूंचे दार नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला उघडेल असे ठेवावे. उत्तर दिशा ही कुबेर दिशा असते. त्यामुळे दार जर दक्षिण दिशेला उघडत असेल तर ते अशुभ मानले जाते.
घराचे मुख्य प्रवेशव्दार हे माता लक्ष्मीचे आगमनस्थान मानले जाते. जर तुमच्या दाराजवळ अंधार असेल किंवा दारात घाण पसरलेली असेल, दारात चपला पडलेल्या असतील तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. त्यामुळे लक्ष्मी घरात येत नाही त्यामुळे पैशांची चणचण जाणवते.
जेवल्यानंतर किचन लगेच स्वच्छ करा. सिंकमध्ये पडलेली उष्टी भांडी, खरकटे तसेच ठेवू नका त्यामुळे घरात दारिद्र्य येते.
तुटलेल्या वस्तू , बंद पडलेल्या वस्तू, तुटलेल्या काचा नकारात्मकतेचे लक्षण आहे. या गोष्टिमुळे प्रगतीमध्ये अडथळा येतो. आर्थिक अडचणी संदर्भात अनेक वाद निर्माण होतात.
घराच्या ईशान्या कोपऱ्यात केव्हाही झाडू आणि कचरा ठेवू नका. त्यामुळे घरात ताणतणाव, आर्थिक हानी सहन करावी लागते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.