Saam Tv
फ्रेश अॅलोवेरा जेल मानेवर लावा. १५ ते २० मिनिटांनी धुवा. त्यामुळे मानेची कोरडी त्वचा मऊ होईल. काळी झालेली मान हळूहळू उजळू लागेल.
लिंबू हा क्लिनींग एजंट आहे. डेड स्किन निघून जाते आणि त्वचा साफ आणि चमकदार होते. त्यात मध मिसळून मानेला लावल्याने रंगात बदल व्हायला सुरूवात होते.
अॅपल साईड व्हिनेगर त्वचेचा pH बॅलन्स करतो. त्यामुळे काळेपणा कमी होतो. पाण्यात मिसळून अॅपल साईड व्हिनेगर कॉटनच्या मदतीने मानेला लावावे काही दिवसातच फरक जाणवेल .
बटाटामध्ये एजाइन्मस असतात जे त्वचेचा रंग उजळवण्यासाठी फायदेशीर असतात. बटाट्याचा रस किंवा काप मानेला १५ - २० मिनिटे लावावे.
बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई चे प्रमाण अधिक असते. व्हिटॅमिन ई मुळे रंग सुधारतो. या तेलाने मालिश केल्याने रंग सुधारेल आणि मानेचा कोरडेपणा निघून जाईल.
दह्यात असणाऱ्या लॅक्टिक अॅसिडमुळे डेड स्किन निघुन जाते. हळदीमुळे त्वचा चमकू राहते आणि हेल्दी राहते. दोन चमचे दह्यात चिमुटभर हळद मिसळून मानेला लावा.
बेकिंग सोड्यात थोडेसे पाणी मिसळून थोडी जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट १५ मिनिटे मानेला लावा. हलकी सुकल्यावर हाताने चोळून धुवा. यामु्ळे डेड स्किन निघून जाईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.