मेदू वड्याच्या मध्यभागी छिद्र का असते, काय आहे त्यामागील शास्त्र?

Bharat Jadhav

वैशिष्ट्यपूर्ण आकार

मेदू वडा हा एक लोकप्रिय दक्षिण भारतीय पदार्थ आहे, जो उत्तर भारतातही अनेकजण मोठ्या आवडीने खातात. कुरकुरीत आणि सोनेरी रंगाचे, गरमागरम वडे केवळ चवीलाच स्वादिष्ट नसतात, तर त्यांचा आकारही वैशिष्ट्यपूर्ण असतो.

मेदू वड्यात छिद्र का केले जाते?

मेदू वडा एका खास तंत्राने बनवला जातो. हा वडा दळलेल्या उडीद डाळीपासून बनवला जातो आणि त्याचे पीठ घट्ट असल्यामुळे ते पूर्णपणे शिजणे आवश्यक असते. मध्यभागी असलेल्या छिद्रामुळे तेल वड्याच्या प्रत्येक भागापर्यंत पोहोचते. ज्यामुळे तो आतून आणि बाहेरून एकसारखा शिजतो. मध्यभागी छिद्र नसल्यास, वडा कच्चा राहतो.

आकारामुळे हलके होतात वडे

वड्याला छिद्रे पाडल्यामुळे ते हलके होतात. त्याचा तेलाशी पूर्ण संपर्क येतो, त्यामुळे ते शिजायला कमी वेळ लागतो आणि कमी तेल शोषतात.

बनतात कुरकुरीत

वड्याच्या मध्यभागी असलेल्या छिद्रामुळे ते लवकर शिजतात आणि कमी तेल शोषून घेतात. यामुळे त्याला कुरकुरीतपणा येतो. याच छिद्रामुळे वडा बाहेरून कुरकुरीत तर आतून मऊ राहतो.

आकार टिकतो

मेदू वडा बनवण्यासाठी पिठाचे मिश्रण तळहातावर घेऊन त्यात एक छिद्र केले जाते आणि नंतर ते तेलात सोडले जाते. या छिद्रामुळे मेदू वड्याला त्याचा आकार टिकवून ठेवण्यास मदत होते.

वड्याला छिद्र नसेल तर काय?

जर वड्याला मध्यभागी छिद्र नसेल तर तो बाटीसारखा होईल. तेलात टाकल्यावर तो पटकन तपकिरी होईल, पण मधला भाग कच्चा राहील.

हेही वाचा

येथे क्लिक करा

भाडेपट्ट्याने शेतजमीन करणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल का? जाणून घ्या नियम