Manasvi Choudhary
उद्या रविवार म्हणजे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
महाशिवरात्रीनिमित्त सर्वजण महादेवाची मनोभावे पूजा करतात तसचे उपवासाचे व्रत धरतात.
तुम्हाला माहितीये का? भगवान शंकराच्या गळ्याभोवती नाग असतो. यामागचे नेमके कारण काय आहे. हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
समुद्रमंथनातून बाहेर पडलेले हलाहल नावाचे विष शिवाने प्राशन केले यामुळे होणारा दाह कमी करण्यासाठी वासुकी नाग त्यांच्या गळ्याभोवती बसला होता असं म्हटलं जाते.
विष प्राशन केल्यामुळे शिवाचा कंठ निळा पडला त्यामुळे त्यांना निलकंठ असेही म्हणतात.
साप हा मृत्यू आणि भीतीचे प्रतीक मानला जातो. बहुतेकांना सापाची भीती वाटते, परंतु शिव त्याला आभूषणासारखे गळ्यात घालतात. याचा अर्थ असा की, शिवांनी आपण मृत्यू आणि काळाच्या पलीकडचे महाकाल आहोत असे दर्शवले आहे.
पौराणिक अख्यायिकेनुसार, भगवान शिवाच्या गळ्यात असलेल्या या नागाचे नाव 'वासुकी' आहे. वासुकी हा नागांचा राजा मानला जातो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.