Surabhi Jayashree Jagdish
डास आपल्या सोंडेने त्वचेला अतिशय बारीक छिद्र पाडून रक्त शोषतो. रक्त मिळवण्यासाठी तो त्वचेखाली पोहोचतो आणि रक्तवाहिनीपर्यंत सोंड नेतो. याच प्रक्रियेदरम्यान शरीरात काही बदल सुरू होतात.
रक्त सहजपणे वाहत राहावं म्हणून डास चावताना आपल्या लाळेचा थोडा भाग त्वचेत सोडतो. डासाच्या लाळेमध्ये रक्त पटकन गोठू न देणारी प्रोटीन असतात. त्यामुळे डासाला अडथळ्याशिवाय रक्त शोषणं सोपं जातं.
डासाच्या लाळेतील प्रोटीनना शरीर Foreign Substance म्हणून ओळखते. त्यामुळे रोगप्रतिकारक यंत्रणा त्वरित एक्टिव्ह होते. हीच प्रतिक्रिया पुढे खाज आणि सूज निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.
डासाच्या लाळेला प्रतिसाद म्हणून शरीर हिस्टामिन नावाचे रसायन सोडतं. हिस्टामिनमुळे त्या भागातील रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्वचेतील चेतातंतू अधिक संवेदनशील होतात. त्यामुळे त्या ठिकाणी खाज येते.
हिस्टामिनच्या प्रभावामुळे त्या भागात रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे त्वचेवर छोटा लालसर उठाव किंवा सूज दिसू शकते. काही लोकांमध्ये ही प्रतिक्रिया अधिक तीव्र असल्याने सूज जास्त काळ टिकू शकते.
नाही, प्रत्येक व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वेगवेगळी असल्यामुळे प्रतिक्रिया देखील वेगळी असते. काहींना खूप खाज आणि सूज येते, तर काहींना अगदी सौम्य त्रास होतो.
डास चावलेल्या जागेवर वारंवार खाजवू नये. कारण त्यामुळे त्वचेवर जखम होऊन संसर्गाचा धोका वाढू शकतो. थंड पाण्याची पट्टी किंवा बर्फ कापडात गुंडाळून काही मिनिटं लावल्यास खाज आणि सूज कमी होण्यास मदत होते.