ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उंटाला वाळवंटातील जहाज म्हणतात.
कधीकधी पोट बॉम्बसारखे फुटतं हे तुम्हाला माहितीये का? हे का घडतं हे तुम्हाला माहिती आहे का?
उंटाचे पोट तीन वेगवेगळ्या भागात विभागलेलं असतं. हे त्याला अन्न पचवण्यास मदत करतात.
उंटाचे पोट मृत्यूनंतर खूप फुगतं.
मृत्यूनंतर उंटाच्या पोटात असलेले जीवाणू आणि विषाणू खूप वेगाने वाढतात.
हे जीवाणू पोटात वायू निर्माण करतात. हे जीवाणू उंटाच्या पोटात अनियंत्रित वायू निर्माण करतात, जो शरीरात जमा होऊ लागतो आणि पोट खूप फुगते.
उंटाची कातडी जाड असते, त्यामुळे वायू शरीरात फुगा फुटल्याप्रमाणे पसरतो आणि त्याचं पोट फुटू शकतं.