ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरवे आणि निळे कपडेच का घालतात?

Manasvi Choudhary

डॉक्टर ड्रेसकोड

हॉस्पीटलमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणारे डॉक्टर आणि नर्सेस नेहमी हिरवे किंवा निळे कपडे परिधान करतात तुम्ही देखील पाहिले असेल.

Doctors Dress Code Logic

डॉक्टर निळ्या आणि हिरव्या रंगाचे कपडे का घालतात?

पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? की डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचेच कपडे ऑपरेशनदरम्यान का घालत असतील?

Doctors Dress Code Logic

रंगाचे महत्व

निळा आणि हिरवा रंग डोळ्यांना आराम देतो आणि तणाव कमी करतो. जेव्हा डॉक्टर आणि त्यांचे सहकारी कर्मचारी एखाद्या रूग्णांवर शस्त्रक्रिया करतात तेव्हा तणावपूर्ण वातावरणात असतात कारण

Doctors Dress Code Logic

महत्वाचे कारण

ऑपरेशन करताना डॉक्टरांना सतत तासान् तास रुग्णाच्या लाल रक्ताकडे आणि शरीराच्या अंतर्गत भागांकडे पाहावे लागते. ऑपरेशन थिएटरमध्ये रक्त, शरीराचे इतर अवयव ज्या स्थितीत दिसतात ते पाहून धक्का बसतो.

Doctors Dress Code Logic

डोळ्यांना त्रास कमी होतो

सलग लाल रंगाकडे पाहिल्यामुळे डॉक्टरांच्या डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. जर अशा वेळी त्यांनी पांढरे कपडे घातले, तर पांढरा रंग डोळ्यांना जास्त चककावतो यासाठी जर हिरवा आणि निळा रंगाचे कपडे घातले तर डोळ्यांना आराम मिळतो आणि डोळ्यांचा थकवा दूर होतो.

Doctors Dress Code Logic

पांढरे कपडे का परिधान करत नाही

पांढऱ्या कपड्यांवर रक्ताचे लाल डाग खूप स्पष्ट आणि भयानक दिसतात, ज्यामुळे ऑपरेशन थिएटरमधील इतर स्टाफ किंवा काही वेळा रुग्णावर मानसिक परिणाम होऊ शकतो.

Doctors Dress Code Logic

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam Tv

NEXT: रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

Monsoon Immunity Boosting Vegetable
येथे क्लिक करा..