Alisha Khedekar
दुपारी गरजेपेक्षा जास्त जेवल्यास पोट भरल्याची भावना वाढते. त्यामुळे सुस्ती जाणवते आणि कामात लक्ष लागत नाही.
भात, पोळी आणि गोड पदार्थांमधील कार्बोहायड्रेटमुळे रक्तातील साखरेची पातळी बदलू शकते. याचा ऊर्जेवर परिणाम होतो.
जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी बदलते. काही व्यक्तींमध्ये या बदलांमुळे थकवा, सुस्ती किंवा झोप येऊ शकते.
जेवणानंतर शरीर अन्नाचे पचन आणि पोषक घटकांचे शोषण करण्याची प्रक्रिया सुरू करते. या काळात काहींना सुस्ती जाणवते.
रात्री पुरेशी झोप न झाल्यास दुपारच्या वेळी थकवा अधिक जाणवतो. जेवणानंतर हा थकवा आणखी वाढल्यासारखा वाटू शकतो.
दिवसभर पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे थकवा आणि एकाग्रतेचा अभाव जाणवू शकतो.