Wedding Rituals: आपण लग्नात अक्षताच का वापरतो? याची महत्त्वाची कारणे जाणून घ्या...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अक्षता

लग्नात अक्षता वापरण्यामागे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत, जी शुभता, समृद्धी आणि नवविवाहित जोडप्यासाठी आशीर्वाद दर्शवतात.

आशीर्वाद आणि समृद्धी

अक्षता पवित्र आणि शुभ मानली जाते, म्हणूनच लग्नात वापरली जाते. ती वधू-वरांसाठी आशीर्वाद व समृद्धीची चिन्हे दर्शवते.

किडत नाही

हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही, त्याला आतून कीड पडत नाही म्हणूनच शुद्धतेला तांदळाची उपमा दिली जाते.

तांदूळ

तसेच तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही आयुष्याचा संसार ही दुभंगू नये ही भावना असते.

शुद्धता आणि पवित्रता

अक्षता शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतीक आहेत. तांदूळ हे शुद्धतेचे प्रतीक आहे, तर कुंकुमाने ते अधिक शुभ आणि पवित्र बनतात.

वधू-वरांसाठी संरक्षण

अक्षता वधू-वरांना वाईट दृष्ट्या आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण करतात.

तांदळाचे महत्त्व

तांदूळ हे एक महत्त्वाचे अन्नधान्य आहे आणि ते जीवन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.

संततीची इच्छा

अक्षता वधू-वरांना संतती प्राप्त होण्यासाठी मदत करतात, अशी मान्यता आहे.

NEXT:  लग्नात नवरदेव किंवा नवरीच्या बहिणीला 'करवली' का म्हणतात? जाणून घ्या

येथे क्लिक करा